त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतले असते तर परिस्थिती चांगली असती! जयंत पाटीलांचा काँग्रेसला टोमणा

Maharashtra Today

मुंबई : २००४ मध्ये राष्ट्रवादीला(NCP) ७२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपद घेतले असते तर परिस्थिती चांगली झाली असती असे आजही वाटते, असे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्त पुन्हा काँग्रेसला टोमणा मारला.

राष्ट्रवादी काँग्रेस आज २२ वा वर्धापण दिन साजरा करत असून यानिमित्त एका वृत्तवाहिनीशी बोलताना पाटील म्हणालेत की, महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीत आपल्या पक्षाचा सिंहाचा वाटा आहे.

पक्षाला मुख्यमंत्रीपद न मिळाल्याची खंत

राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद न मिळाल्याच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, “राजकीय परिस्थितीप्रमाणे तडजोड करने आवश्यक असते. २००४ मध्ये राष्ट्रवादीला ७२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळूनही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्याचा निर्णय आम्ही त्यावेळी घेतला. त्यावेळी आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर परिस्थिती चांगली झाली असती असे आजही वाटते.

पहाटेच्या शपथविधीचा प्रतिमेवर परिणाम

ज्यावेळी ही घटना झाली तेव्हा पक्षात मतभिन्नता होती. त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम झाला. पण त्यानंतर पक्षातील नेते आणि कार्यकर्ते शरद पवारांच्या मागे उभे राहिले. अजित पवारही आज एकत्रितपणे काम करत आहेत. मागच सगळ विसरुन सगळे एकत्र काम करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button