आरक्षण मिळत असेल तर उद्याच खासदारकीचा राजीनामा देतो, संभाजीराजे संतापले

Sambhaji Raje

सोलापूर : राजीनामा देऊन मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळत असेल तर मी उद्याच खासदारकीचा राजीनामा देतो, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे राज्य दौऱ्यावर असून आज ते सोलापुरात होते. यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) कडक इशारा दिला.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) रद्द केल्यामुळे मराठा समाज आता आक्रमक झाला आहे. राज्यभरात मराठा संघटना बैठका घेऊन रणनीती आखली जात आहे. २८ मे रोजी ते मुंबईत येऊन मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार आहेत. कोणत्याही सरकारविरोधात किंवा पक्षाविरोधात हा दौरा नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. ओबीसी समाजाचे ज्येष्ठ लोक भेटले त्यांनी मला चांगला मार्ग सांगितला. मराठा समाजाची दिशाभूल होऊ नये यासाठी दौरा करतोय. अनेक्षर भाषांतरीत झाली नाहीत त्यामुळे हा फटका बसला. लोकांना काय वाटतेय यापेक्षा कायदा काय आहे हे पाहणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

राज्य आणि केंद्र सरकारने काय भूमिका घ्यायची ते पहावे लागेल. सारथी संस्थेची दुरावस्था किंवा वसतिगृहाचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्याचे काम राज्याने करावे. माझी भूमिका पक्षाची नाही तर समाजाची आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सप्टेंबर २०२० पुर्वीच्या नियुक्त्या राज्य सरकारने कराव्यात. घराण्याचा वंशज म्हणून समाजाचा घटक म्हणून मी भूमिका घेत आहे. माझी भूमिका पक्षाची नाही तर समाजाची आहे. घराण्याचा वंशज म्हणून समाजाचा घटक म्हणून मी भूमिका घेतोय. या विषयावर भारताच्या इतिहासात संसदेत पहिल्यांदा आंदोलन करणारा मी पहिला खासदार आहे, असंही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालाने सांगितले आहे सप्टेंबर २०२० पुर्वीच्या नियुक्त्या राज्य सरकारने कराव्यात, असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button