राजकारणात आले तर हिमाचलमधून निवडणूक लढवणार नाही – कंगना रनौत

kanagna ranaut

गेल्या जवळ जवळ वर्षभरापासून कंगना रनौत (Kangana Ranaut) बॉलिवूड आणि समाजातील काही विशिष्ट लोकांवर कडाडून टीका करीत आली आहे. तिच्या एकूण वागण्यामुळे ती भाजपात (BJP) असल्यासारखे वाटत असून अनेक जण तिला भाजपाची कार्यकर्ती मानतात. कंगनाने मुंबईतही शिवसेनेबरोबर पंगा घेतला आहे. शिवसेनेने तिच्यावर केसेस केल्या असून न्यायालयात ती त्याविरोधात लढत आहे. भाजप कंगनाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याच्या चर्चाही गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. पण कंगनाने कधीही याबाबत वक्तव्य केले नव्हते. मात्र काल प्रथमच कंगनाने याबाबत वक्तव्य करीत राजकारणात सध्या येण्याचा विचार नाही. पण भविष्यात जेव्हा राजकारणात येईन तेव्हा हिमाचलमधून निवडणूक न लढवता (will not contest from Himachal) जेथे अत्यंत निवडणूक लढवणे अत्यंत कठीण असेल तेथून निवडणूक लढवेन असे म्हटले आहे.

कंगनाच्या राजकारण प्रवेशाची चर्चा एका ट्विटमुळे सुरु झाली. हिमाचलमधील मंडी येथील भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिकामी झाली आहे. एकाने ट्विट करीत कंगना मंडीच्या पोटनिवडणुकीला उभी राहिल आणि संसदेत निवडून जाईल असे म्हटले. त्याने या ट्विटमध्ये कंगनालाही टॅग केले. यावर कंगनाने लगेचच प्रतिक्रिया दिली. कंगना म्हणाली, मला मागील निवडणुकीच्या वेळेसही उमेदवारी दिली जाणार होती. ग्वालियरमधून मला तिकीट दिले जाणार होते पण मी ते नाकारले. कारण एवढ्यातच मला राजकारणात उतरण्याची इच्छा नाही. मला जर कधी राजकारणात यावेसे वाटले तर मी येईन. पण हिमाचलमधून निवडणूक लढवणार नाही. हिमाचल प्रदेशची लोकसंख्या ७० ते ८० लाख आहे. येथे गरीबी आणि गुन्हेगारी कमी आहे. जर मी राजकारणात आली तर अशा राज्यात जाईन जेथे गरीबी आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे. जेथे निवडणूक सोपी असणार नाही, अशा ठिकाणी निवडणूक लढवून तेथे मी विजय मिळवेन. तुझ्यासारखे छोटे मासे मोठ्या माशांचे बोलणे समजू शकणार नाही असेही तिने टिव्ट करणाऱ्याला सुनावले आहे.

कंगनाने पुढे म्हटले, ‘हिमाचल प्रदेशमधील एका राजकीय नेत्याचा आज मृत्यू झाला आणि प्रत्येक मूर्ख अशा छोट्या गोष्टी बोलू लागला आहे. अशा गोष्टी बोलण्यापूर्वी त्यांनी माझी लेव्हल तरी समजून घेणे आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही बब्बर शेरनी राजपूत कंगना रनौकतबाबत बोलत आहात. तर छोट्या गोष्टी बोलू नका असा सल्लाही तिच्या निवडणूक रिंगणात उतरण्याबाबत सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करणाऱ्यांना दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER