ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध केल्यास, गावाला ५० लाखाचा निधी : ना. राजेंद्र पाटील यड्रावकर

Rajendra Patil Yadravkar

कोल्हापूर : ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे कमालीची ईर्षा, गावागावात गटातटाचे राजकारण. यामुळे वाद विवाद ठरलेले. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गावागावात निर्माण होणारी कटुता टाळावी आणि विकासकामासाठी भरीव निधी ग्रामपंचायतीला उपलब्ध व्हावा असा दुहेरी उद्देश ठेवून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर (Rajendra Patil Yadravkar) यांनी नामी शक्कल लढविली आहे. ते प्रतिनिधीत्व करत असलेल्या ‘शिरोळ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना त्यांनी आवाहन केले आहे, ‘ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करा, गावाला ५० लाख रुपयांचा निधी देऊ’अशी घोषणा त्यांनी केली आहे.

मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, ‘शिरोळ विधानसभा मतदारसंघातील ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर लढविल्या जातात. तर जिल्हा परिषद पंचायत समिती, विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका पक्षीय पातळीवर होतात. ग्रामपंचायत निवडणुकीमुळे स्थानिक पातळीवर गावात कटुता निर्माण होऊ नये आणि गावचा सर्वांगिण विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्रित आले पाहिजे. गटतट, पक्ष विसरुन सगळे एक झाले पाहिजेत. यासंबंधी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. आणि गावचा विकास डोळयासमोर ठेवूनग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध केल्या तर त्या गावच्या विकासासाठी तातडीने ५० लाख रुपयांचा निधी देऊ.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER