गोस्वामींच्या जीवाला धोका झाल्यास त्याची जबाबदारी आघाडी सरकारची – नारायण राणे

Narayan rane-Arnab Goswami

सिंधुदुर्ग : अन्वय नाईक (Anvay Naik) आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना आता अलिबागहून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे. अर्णव यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र सुरक्षा कारणांचा हवाला देत पोलिसांनी त्यांना तळोजा कारागृहात हलवले.

दरम्यान, यानंतर भाजपा नेते नारायण राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत अर्णव गोस्वामी यांच्या जीविताला काही धोका निर्माण झाला तर त्याची जबाबदारी सरकारची असेल असं म्हटलं. अर्णव गोस्वामी यांचं प्रकरण उच्‍च न्‍यायालयामध्‍ये असूनही वारंवार वेगवेगळ्या तुरुंगात हलवून त्‍यांचा शारीरिक छळ राज्‍य सरकार आणि पोलिसांनी चालवला आहे. राज्‍य सरकारकडून पत्रकारितेची गळचेपी होत आहे. गोस्‍वामी यांच्‍या जीविताला काही धोका निर्माण झाल्‍यास त्‍याची जबाबदारी महाआघाडी सरकारची राहील, असं म्हणत नारायण राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER