‘माल’ घेतला नाही तर १२ वकिलांची फौज कशासाठी? शर्लिनचा दीपिकाला टोमणा

Deepika Padukon & Sherlyn Chopra

मुंबई : अमलीपदार्थांसंबंधी अभिनेत्री दीपिका पदुकोन (Deepika Padukon) हिची एनसीबीच्या गेस्ट होऊसमध्ये चौकशी सुरू आहे. तिने दिलेल्या उत्तरांनी एनसीबीचे अधिकारी समाधानी नाहीत, अशी माहिती आहे. दीपिकाचे चाहते सोशल मीडियावर तिच्यासोबत असल्याचे दिसते.

#standwithdeepika हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होतो आहे. परंतु अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिनं दीपिकाला टोमणा मारला – ‘माल’ घेतला नाही तर १२ वकिलांची फौज कशासाठी? अमलीपदार्थांच्या चौकशीबाबत एनसीबीचे समन्स मिळाल्यानंतर दीपिकाने १२ वकिलांची टीम तयार केली आहे. दीपिकाला या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी कायदा सल्लागार आणि वकील अशी १२ जणांची टीम कामाला लागली आहे.

यावर शर्लिनने ट्विट करून दीपिकाला टोमणा मारला – जर तू ‘माल’चं  (ड्रग्ज) सेवन केलं नाहीस, तर १२ वकिलांचा सल्ला घेण्याची गरज का पडली? खरं  बोलणाऱ्या व्यक्तीला ‘पॅनिक’ किंवा ‘ऐंग्जाइटी अॅटॅक्स’ येत नाहीत. चित्रपटसृष्टीचे ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. दीपिकासारख्या अभिनेत्रीचे नाव यात आल्याने अनेक मोठ्या सेलिब्रिटींचे धाबे दणाणले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER