अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर होत असेल तर नियंत्रण आणा – श्रीधरन्

E_Sreedharan

सध्या सुरू असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वादात ‘मेट्रोमॅन’ (Metroman) ई. श्रीधरन् यांनीही उडी घेतली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गैरवापराचा विरोध करताना ते म्हणाले की, परकीयांसमोर सरकारची प्रतिमा मलीन करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठरू शकत नाही. ते आस्थापनांविरुद्धच्या युद्धासमान असते त्यामुळे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वदेशाविरुद्ध गैरवापर होत असेल तर या घटनात्मक अधिकारावर नियंत्रण ठेवले पाहिजे. श्रीधरन् (Sreedharan)लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत.

नरेंद्र मोदींच्या विरोधकांवर टीका करताना ते म्हणालेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने काही केले की त्याला विरोध करायचाच अशी आता प्रथाच पडली आहे. श्रीधरन् यांनी केंद्राच्या कृषी कायद्यांचे ठामपणे समर्थन केले. केरळमध्ये भाजपा सत्तेवर आल्यास मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार आहे, असे ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER