शेतकऱ्यांना एमएसपी मिळाली नाही तर राजीनामा देणारा मी पहिला असेन – दुष्यंत चौटाला

Dushyant Chautala

चंढीगड :माझ्यासाठी शेतकरी सर्वप्रथम आहे. शेतकऱ्यांना पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळाली नाही तर राजीनामा देणाऱ्यांमध्ये मी सर्वांत  पहिला असेन, असे हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) म्हणालेत. ते म्हणालेत, आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आधीच स्पष्ट केले होते की, शेतकऱ्यांना एमएसपी निश्चित केली जावी.

काल केंद्र सरकारद्वारे देण्यात आलेल्या लेखी प्रस्तावात एमएसपीचा समावेश आहे. जोपर्यंत मी उपमुख्यमंत्री आहे, तोपर्यंत शेतकऱ्यांचा एमएसपी निश्चित मिळावा  यासाठी प्रयत्न करेन. एमएसपी मिळवून देऊ शकलो नाही तर राजीनामा देईन.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चौटाला म्हणालेत, केंद्र सरकार किमान आधारभूत किंमतीसाठी  (एमएसपी)  शेतकऱ्यांना लिहून देण्यासाठी तयार आहे. शेतकरी संघटनांची सरकारशी सतत चर्चा सुरू आहे. लवकरच तोडगा निघेल. सरकारमध्ये असेपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमतीचा  (एमएसपी) मुद्दा मांडत राहीन.

ही बातमी पण वाचा : शेतकऱ्यांच्या आंदोलनात पोहोचले ठाकरे सरकारचे मंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER