फडणवीसांनी सरकार पाडण्याची तारीख ठरवली, आमच्या शुभेच्छा ! – संजय राऊत

Sanjay Raut - Devendra Fadnavis

मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना (Corona) रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. गेले काही दिवस दररोज ५० हजारांपेक्षा जास्त रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे राज्यात कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊन (Lockdown) केल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे म्हणत शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत दिले आहे. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती तशी नियंत्रणात आहे. राज्याबाहेरून येणाऱ्या लोकांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे. त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.

देशभरात कोरोना वाढत आहे. लोक कसेही वागत आहेत. लोकांनी नियम पाळले नाही तर संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू शकतो, असंही ते म्हणाले. यावेळी राऊत यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीकास्त्र सोडलं. राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो. फडणवीस आणि आमचे वैयक्तिक वाद नाहीत. आमचं राजकारणातील युद्ध आम्ही लढूच. त्यामुळे फडणवीसांना आमच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आहे. त्यांनी जर सरकार पाडण्यासाठी नवी तारीख मुकर्रर केली असेल तर त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत, असा खोचक टोलाही राऊत यांनी फडणवीसांना लगावला. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईचा कडाडून विरोध केला. महाभारताचंही युद्ध लढलं गेलं. त्यावेळी शिखंडीला पुढे करून युद्ध लढलं गेलं.

पश्चिम बंगालमध्येही युद्ध सुरू आहे. पण पश्चिम बंगालचे शिखंडी कोण आहेत? त्याचा शोध घेतला पाहिजे. कोणत्या शिखंडींना पुढे करून बंगालमधील युद्ध लढलं जातंय हे पाहावं लागेल, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच ममतादीदींनी नियमभंग केला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण इतरांनी नियमभंग केलाच नाही का? सर्व काही आलबेल आहे का? की दीदींसाठी काही नियम वेगळे आहेत? निवडणूक आयोगाने भाजपच्या आदेशानुसार कारवाई केली असेल. जर भाजपच्या सांगण्याने निवडणूक आयोगाने कारवाई केली असेल तर लोकशाहीवर गदा आणण्याचे काम आहे.

ही बातमी पण वाचा : सभेत फडणवीसही भिजले आणि जयंत पाटीलही, मात्र फायदा भगीरथ भालकेंचा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button