आश्वासने पूर्ण केले नाही तर जनतेचा मार नेत्यांनाच : गडकरी

nitin-gadkari

नवी दिल्ली :– निवडणुका आल्या की नेत्यांना जिकंण्यासाठी जनतेला आश्वासनं द्यावी लागतात , असे विधान काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते . आता पुन्हा एकदा गडकरी यांनी एका कार्यक्रमात अशाच प्रकारचे वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडचणीत आणले आहे.

एका कार्यक्रमात बोलत असताना गडकरी म्हणाले की “स्वप्न बघणं लोकांना आवडतं, मात्र ती स्वप्न पूर्ण झाली नाहीत तर ही स्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांची जनता धुलाई करते” गंगा स्वच्छता अभियानाबाबत बोलतांना गडकरी यांनी असे विधान केले आहे . सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने गंगा स्वच्छ करणार अशी घोषणा केली होती. मात्र पाच वर्षाचा कालावधी लोटला तरीही त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही .

ही बातमी पण वाचा : “मला पंतप्रधान पद नको; वर्तमान पदावर मी समाधानी”! – नितीन गडकरी

गंगेमध्ये एअरबोट सुरू करण्याचा विचार असून कुंभमेळ्यात प्रयागराज ते वाराणसीपर्यंत भक्तांसाठी बोटीचा प्रवास सुरू करण्याबाबत गडकरी यांनी कल्पना मांडली.गडकरी यांनी अप्रत्यक्षरीत्या याच मुद्द्यावर बोलतांना ‘मी आज कोणतेही आश्वासन देणार नाही, पण हा प्रयत्न यशस्वी झाल्यास जलवाहतूक सुरू होऊन क्रांतिकारी परिवर्तन होईल’ असं मत व्यक्त केलं. दरम्यान गडकरी यांनी 26 जानेवारीपर्यंत एअरबोर्टच्या दिल्ली-आग्रा आणि प्रयागराज-वाराणसीदरम्यान यशस्वी चाचण्या होतील असा विश्वासही यावेळी व्यक्त केला .