चर्चा अपेक्षित होती तर शरद पवार राज्यसभेत गैरहजर का राहिलेत ? – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - Sharad Pawar

मुंबई :- केंद्राच्या शेती कायद्यांवर चर्चा व्हावी असे शरद पवार यांना वाटत होते तर हे विधेयक राज्यसभेत सादर झाले त्या दिवशी पवार सभागृहात उपस्थित का राहिले नाहीत? असा प्रश्न भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी शेतकरी कायद्याबाबत रविवारी रात्री एक ट्विट केले, त्या ट्विटबाबत पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शेती कायद्यांबाबत पवारांच्या भूमिकेवर टीका करताना पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने सतत शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे प्रयत्न केले. ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत हे कायदे पास झाले, त्यावेळी या कायद्याबाबत चर्चा झाली पाहिजे, असे जर शरद पवार यांना वाटत होते तर त्या दिवशी त्यांनी राज्यसभेत हजर राहणे आवश्यक होते.

पाटील म्हणालेत, दीड वर्ष कायद्याची अंमलबजावणी थांबणार आहे, त्या काळात चर्चा होणार आहे आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेतले जाणार आहे. सध्या आडमुठेपणा चालला आहे. शिवसेनेने तर या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला आणि राज्यसभेत बहिष्कार टाकला! बहिष्कार टाकताना मतदान का केले नाही?

हे सगळे निवडणुकीत हरल्यामुळे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) आणि भारतीय जनता पार्टीला त्रास देण्यासाठी सुरू आहे. आता न्यायालयाने दीड वर्षांसाठी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता शरद पवार यांनीच शेतकर्‍यांना आपापल्या घरी जाण्याचा सल्ला द्यायला हवा; कारण आता शेतकऱ्यांचे बर्‍यापैकी समाधान झाले आहे, असे ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : साहेब भेटल्यावर मी त्यांना वाकून नमस्कार करणार, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला शरद पवारांविषयीचा आदर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER