धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर तत्काळ राजीनामा घेतला असता; हुसेन दलवाईंचा राष्ट्रवादीला टोमणा

Husain Dalwai

चिपळूण : रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धंनजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतरही राष्ट्रवादीने त्याचा राजीनामा घेतला नाही. यावर, राष्ट्रवादीला नैतिकतेची आठवण करून देत काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई (Hussein Dalwai) यांनी टोमणा मारला – धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात विरोधकांनी रान उठवले आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपा महिला आघाडी राज्यभरात आंदोलन करणार आहे, त्याचवेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह, महाविकास आघाडीचे काही नेते धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी मात्र याबाबत वेगळे मत व्यक्त केले आहे. धनंजय मुंडे काँग्रेसमध्ये असते, तर त्यांचा तत्काळ राजीनामा घेतला असता, असे म्हणालेत.

या प्रकरणी शुक्रवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि अतिरिक्त आयुक्त संदीप कर्णिक, ज्योत्स्ना रासम यांची बैठक घेतली. एक आठवड्यात धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करावी अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली. सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुंबई पोलीस सहा आठवड्यांच्या चौकशीनंतर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेऊ शकतात. या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी पूर्ण व्हावी असे गृहमंत्री म्हणालेत.

शरद पवार (Sharad Pawar)

आम्ही धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत चर्चा केली आहे, त्या महिलेवरही ब्लॅकमेलिंगसारखे गंभीर आरोप झाले आहेत, वेगळ्या विचारांचे, वेगळ्या भूमिकेचे लोकही एकाच महिलेबद्दल बोलत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची एसीपी दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी, असे आपण सुचवले आहे. आता हे प्रकरण पोलिसांकडे आहे. संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे शरद पवारांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER