देंवेंद्रचं नाव राजे भोसले, राजे शिर्के किंवा राजे महाडिक असते तर… – उदयनराजे भोसले

Devendra Fadnavis - Udayan Raje Bhosale

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosale) चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजात प्रचंड खदखद आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा प्रश्न सुटला नाही तर १८५७ प्रमाणे क्रांती होईल आणि लोक नेत्यांना मारुन टाकतील, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. तसेच देवेंद्रजींनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, असे सांगत राजकारण केलं जात असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी काही जण मी ब्राह्मण असल्याने माझ्याभोवती संशयाचं वातावरण निर्माण करत आहेत असा आरोप केला होता. यासंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांना विचारलं असता, उदयनराजे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जातीचं लेबल लावून होणारा आरोप चुकीचा आहे. त्या बिचाऱ्याचा काय संबंध, त्यांचं नाव राजे भोसले असतं, राजे शिर्के किंवा राजे महाडिक असतं तर…., यात जातीचा प्रश्नच येत नाही. त्यांनी जेवढं करायचं तेवढं देवेंद्रजींनी केलं आणि प्रामाणिकपणे केलं. बाकीच्यांना जर राजकारण आणायचं असेल, तर लोकं त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाहीत, असे म्हणत उदयनराजेंनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल जातीय रंग देणाऱ्यांना चपराक लगावली.

तसेच, मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शक्य तेवढं केल्याचंही उदयनराजेंनी सांगितलं.पंतप्रधान, मुख्यमंत्री हे पदं असतात. हे पदं लोकांनी निर्माण केले, त्यांनी तुम्हाला निवडून दिलं आहे. देवेंद्र माझा खास मित्र आहे, त्याचं बिचाऱ्याचं काय चुकलं? या प्रकरणात ब्राह्मण असल्याचा संबंधच काय? जाता जाता जात नाही त्याला जात म्हणतात. लोकशाही लोकं मतदानाचा हक्क बजावत नाही, तर ते जातीला मतं देतात. त्यामुळेच चांगले लोकं लांब राहिलेत, असंही उदयनराजे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER