देवेंद्र फडणवीस पोलीस ठाण्याऐवजी दिल्लीला गेले असते तर राज्याला मदत झाली असती : बाळासाहेब थोरात

संगमनेर : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . कोरोनाच्या संकटात राजकारण करू नये, हीच अपेक्षा आमची सगळ्यांची आहे. दुर्दैवाने तेच घडते आहे. अशाच प्रकारची परिस्थिती आहे. राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते दिल्लीला गेले असते, तर तेथून ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची महाराष्ट्राला खूप मदत झाली असती. परंतु तो फार्मा कंपनीवाला कुणीतरी त्यांचा कार्यकर्ता आहे. म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात जाणे हे काही फार योग्य नाही. असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना लगावला आहे . दरम्यान मुंबई पोलिसांनी दमण येथील एका फार्मा कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतले होते. यामुळे राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button