२०२१ मध्ये कोरोना वाढला तर एका पिढीचे भविष्य येईल धोक्यात; यूनिसेफचा अहवाल

UNICEF

नवी दिल्ली : २०२१ मध्ये कोरोनाची साथ कायम राहिली तर एका संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात येईल, असा इशारा यूनिसेफने एका अहवालात दिला.

संयुक्त राष्ट्रांमधील लहान मुलांसाठी काम करणाऱ्या या संघटनेचे म्हणणं आहे की, कोरोनाचा धोका मुलांसाठी वाढला आहे. कारण, कोरोनामुळे अनेक देश आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

१४० देशांमध्ये सर्वे

१४० देशांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून एका पिढीसमोर असलेल्या तीन प्रकारच्या धोक्यांसदर्भात माहिती उघड झाली आहे. या धोक्यांमध्ये कोरोना महामारीचे परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरिबी आणि असमानतेचा समावेश करण्यात आला आहे.

२० लाख मुलांवर मृत्यूचे सावट

यूनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजेच ‘युनिसेफ’चे म्हणणं आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लसीकरणातही अडथळे येण्याची शक्यता आहे. वेळेत लसीकरण आणि आरोग्याशी निगडीत सेवांमध्ये सुधारणा केली नाही तर पुढिल १२ महिन्यांमध्ये सुमारे २० लाख मुलांचा मृत्यू होण्याचा धोका आहे. कोरोनामुले युवा पिढीची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशाराही यूनिसेफने दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER