काँग्रेसने सन्मानजनक जागा न दिल्यास स्वबळावर लढू, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा

Congress-NCP

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकीला (Nagpur Municipal Corporation Elections) अजून एक वर्षापेक्षा जास्त कालावधी उरलेला असतानाही सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काँग्रेसने (Congress) सन्मानजनक जागा दिल्या नाही, तर नागपुरातील सर्व जागा स्वबळावर लढू, असा इशारा राष्ट्रवादीचे (NCP) नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर (Anil Ahirkar) यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी नागपूर महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), खासदरा प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी आणि छोट्या बैठका सुरु केल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी सोमवारी दिवसभरात सहा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते, वेगवेगळ्या समाजातील प्रतिष्ठितांच्या भेटी घेतल्या.

राष्ट्रवादीचे दिग्गज मैदानात

राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसने सन्मानजनक जागा दिल्या नाहीत, तर नागपुरातील सर्व जागा लढवू, स्वबळाच्या दिशेने तयारी सुरु आहे” अशी माहिती यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी दिली. यासाठी अनिल देशमुख आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मैदानात उतरले असल्याची माहिती अहिरकर यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER