मुख्यमंत्र्यांनी लाथ मारली तर माझ्यासाठी इतर पर्याय खुले : खासदार संजय काकडे

If CM Kicked me, othe alternatives open for me : MP Sanjay Kakde

पुणे : पुण्यातून भाजपचे तिकीट मिळत नसल्याचे दृष्टीपथास येताच भाजपचे खासदार संजय काकडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे असून त्यांनी माझा विचार करावा त्यांनीच जर लाथ मारली तर मला इतर पर्याय खुले असल्याचे खासदार काकडे म्हणाले.

उल्लेखनीय आहे कि पुणे लोकसभा मतदार संघाची ही जागा काँग्रेसच्या कोट्यात जाण्याची शक्यता आहे.

ही बातमी पण वाचा:- अजित पवारांच्या फिरकीमुळे भाजप आमदारांच्या पोटात गोळा

काकडे म्हणाले कि, भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यंनी माझ्यावर अन्याय केला असून मला या दोघांनी काय डावलले आहे. आता या दोघांचे ऐकून मुख्यमंत्री निर्णय घेणार असतील तर मला इतर पर्याय शोधावे लागतील. मी आज अजित पवारांना भेटलो आहे. त्यांचे पुण्यात राजकीय वजन आहे. मुख्यमंत्री मला डावलणार असतील तर माझ्यासाठी इतर मार्ग मोकळे आहेत, असे काकडे म्हणाले. मला कार्यकर्त्यांकडून तसेच नगरसेवकांकडूनही चांगली वागणूक मिळत नाही. माझ्या कार्यकर्त्यांना कुठलीही पदे देण्यात आली नाही. आतापर्यंत मी शांत राहिलो. मात्र मला लोकसभेसाठी डावलले गेल्याचे ते म्हणाले.

मी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर मला न पटणा-या गोष्टी घालणार आहे. त्यानंतर माझा निर्णय काय असेल ते मी ठरवेन असेही काकडे म्हणाले. आता मुख्यमंत्री संजय काकडेंची समजूत घालणार काय हे पाहणे महत्वाचे आहे.