गृहमंत्र्यांसारखे प्रमुख पोलीस किंवा डीजीपी वागले असता त्यांना काढून टाकले असते : माजी डीजीपी शेष पॉल वैद

anil deshmukh - DGP Shesh Paul Vaid - Maharastra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकारणात चांगलीच चर्चा गाजत आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केले आहे. गृहमंत्र्यांनी वाझेला १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. आर्थिक व्यवहारांबाबत बोलण्यासाठी सचिन वाझेनी अनिल देशमुख यांची भेट घेतली, असेही सिंग म्हणाले. यासंदर्भात जम्मू-काश्मीरचे माजी डीजीपी शेष पॉल वैद (DGP Shesh Paul Vaid) यांनी ट्विट केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात अनिल देशमुख यांच्याबाबत भ्रष्टाचाराचे आरोप केले आहे. परमबीर सिंग यांनी आता सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. या प्रकरणी अनिल देशमुखांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करणारी याचिका त्यांनी न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे, या प्रकरणात पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात जम्मू-काश्मीरचे माजी डीजीपी शेष पॉल वैद गृहमंत्र्यांबाबत ट्विट करत म्हणाले की, “गृहमंत्री अनिल देशमुख भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे गेल्यानंतरही त्यांनी आठवडाभरात राजीनामा दिला नाही. जर पोलीस प्रमुख किंवा डीजीपी यांना अशाच प्रकारच्या आरोपांचा सामना करावा लागला असता, तर त्यांना काही तासांतच काढून टाकले असते. याबाबत देशातील राजकारण्यांची कोणतीही जबाबदारी नाही?”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button