बेळगावात उमेदवार हरला तर शिवसेना जबाबदार : निलेश राणे

मुंबई :- काँग्रेसला जिंकण्यासाठी शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची दिशाभूल केली. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार बेळगावात हरला तर शिवसेना जबाबदार राहणार, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राऊतांवर टीका केली. राऊत यांनी बेळगावात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रचार केला. सध्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकांच्या प्रचार थंडावल्या आहेत.

“महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार बेळगावात हरला तर फक्त शिवसेना जबाबदार. काँग्रेसला जिंकवण्यासाठी संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची दिशाभूल केली आणि महाराष्ट्राची बाजू कमजोर करण्याचे पाप शिवसेनेने केले. जी एकी समितीमध्ये होती, त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचे काम राऊतांनी केले.” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर केली आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ मे रोजी निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत सुरेश अंगडीच्या पत्नी मंगला अंगडी आणि काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी भाजपकडून रिंगणात आहेत. यांच्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके अशी टक्कर आहे.

शिवसेनेची माघार

शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. नंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. यामुळे बेळगाव पोटनिवळणुकीची लढत तिरंगी झाली आहे. काँग्रेसचे सतीश जारकीहोळी हे मूळचे गोकाक भागातील आहे. त्यांना गोकाक आणि अरभावीतील मतदारांसह कन्नड भाषिक तसेच दलित आणि मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे. एकूण १० उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button