बॉम्बेचे मुंबई झाले, मग औरंगाबादचे संभाजीनगर का नाही? उदयनराजे कडाडले

Udayan Raje Bhosale

सातारा : औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरण प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले  (Udayan Raje Bhosle) यांनी प्रश्न केला – बॉम्बेचे मुंबई झाले, मग औरंगाबादचे संभाजीनगर का नाही ? मात्र, याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणालेत, राजेशाही असती तर माझे मत व्यक्त केले असते.

पोवई नाका येथील ग्रेडसेप्रेटरचे काम पूर्ण झाले; पण मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन रखडल्यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. हे समजताच उदयनराजेंनी पाहणी करून छत्रपती संभाजी महाराज नाव असलेल्या या ग्रेडसेप्रेटरचे उद्घाटन करून हा मार्ग सामान्यांसाठी खुला करून दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER