आरक्षणासाठी कोणीही आंदोलन करत असेल तर भाजप त्यांच्या पाठीशी : चंद्रकांत पाटील

पुणे : खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणासाठी जे जे आंदोलन करतील, त्यांना आमचा पाठिंबा आहे. उद्या शरद पवारांनी (Sharad Pawar) आंदोलन केले तर त्यांच्याही पाठीशी उभे राहू. संभाजीराजे तर आमचे राजे आहेत. त्यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही महाराजांना मदत करायला तयार आहोत, असे भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजीराजेंच्या घोषणेचे आम्ही स्वागत करतो. मराठा आरक्षणासाठी कोणीही आंदोलन करत असेल तर भाजप त्यांच्या पाठीशी आहे. संभाजीराजेंना आमचे काही सहकार्य हवे असेल तर आम्ही त्यांना मदत करू. आमच्या हातात झेंडा नसला तरी आमची ओळख गडद आहे. आम्हाला महाराजांचे नेतृत्व मान्य आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, हे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. यावरही त्यांनी टीका केली. पवारांच्या वाक्यात दांभिकपणा आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) केस नीट चालवली नाही, असे मराठा समाज म्हणत आहे. सरकारने सारख्या तारखा मागितल्या. त्यामुळे कायद्याला स्टे आला. आरक्षण रद्द झाल्यापासून पुनर्विचार याचिका दाखल करा, असे आम्ही सांगत आहोत. पण सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. आता आयोग नेमला आहे. त्याला स्टाफ आणि बळ पुरवा, असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button