‘शरद पवार यांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवार यांनीच’ – निलेश राणे

Nilesh Rane - Sharad Pawar - Ajit Pawar

मुंबई : राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे विधान गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी ‘लोकमत ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत केले होते. मात्र या विधानानंतर अनिल देशमुख यांनी त्याबाबत सारवासारव केली होती. त्यानंतर आज शिवसेनेनं (Shiv Sena) आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. ‘फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटे शपथविधी पार पाडला. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाट्य वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले’ असा दावा सेनेनं केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत सडकून टीकास्त्र सोडले आहे. आणि याच मुद्द्यावरून भाजपाचे (BJP) नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे (Nilesh Rane) ट्विट करत म्हणाले की, शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या शपथविधीवर टीका करते. परंतु उपमुख्यमंत्री आणि राष्टवादीचे नेते अजित पवार पहाटे- पहाटे राज्यपालांच्या बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते का, असा सवाल निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे त्यावेळी आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले, असं निलेश राणे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवार यांनीच केला, असा दावा देखील निलेश राणे यांनी यावेळी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER