एकाही अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला तर…,डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा

Donald Trump

वॉशिंग्टन :- इराकची राजधानी बगदाद येथे अमेरिकन दुतावासावर रॉकेट हल्ला झाला. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार ठरवले आहे. या हल्ल्यात एकाही अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला तर सैन्य कारवाई करण्याचा सूचक इशारा दिला. ट्रम्प यांनी अमेरिकन दुतावासावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेल्या रॉकेटचा फोटो ट्विट करत ‘हे इराणमधून आले’ असा उल्लेख केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केले – बगदादामधील आमच्या दुतावासावर रॉकेट हल्ला करण्यात आला. तीन रॉकेट अपयशी ठरले. हे रॉकेट कुठून आले होते याचा अंदाज लावा – इराण…इराणमध्ये अमेरिकन नागरिकांवर अजून हल्ले होणार असल्याची चर्चा आम्ही ऐकत आहोत. इराणला माझा मैत्रीपूर्ण सल्ला आहे; एका अमेरिकन नागरिकाचा जरी मृत्यू झाला तर यासाठी मी इराणला जबाबदार धरणार आहे. हे मी अत्यंत गांभीर्यांने घेतो आहे.

इराकच्या लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रविवारी अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ग्रीन झोन परिसरातील अमेरिकन दुतावासावर रॉकेट हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढण्याची शक्यता आहे. जवळपास आठ रॉकेट दुतावासावर डागण्यात आलेत, असे लष्कराने सांगितले आहे. या हल्ल्यात इराकचे अनेक सैनिक जखमी झाले असून कार आणि इमारतींचे नुकसान झाले.

जनरल कासीम सुलेमानीच्या हत्येची आठवण करुन देण्यासाठी इराणकडून इराकमध्ये ३ जानेवारीला देत हल्ला केला जाऊ शकतो, अशी व्हाईट हाऊसला भीती आहे. अमेरिकेने केलेल्या त्या हवाई हल्ल्यात जनरल सुलेमानी ठार झाला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER