अजित पवारांची ताकद असती तर आज फडणवीसांचं सरकार असतं – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil & Ajit Pawar

अहमदनगर :- अजित पवारांची ताकद असती तर आज फडणवीसांचं सरकार असतं, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) साईबाबाच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली.

पाटील म्हणाले की, अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर 80 तासांचे सरकार आले त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार टिकवता आले असते. त्यांच्या आमदारांना त्यांनी सांभाळलं असतं तर सरकार टिकले असते. भाजपमधले काही आमदार नाराज आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या दाव्यावर तुमचं आघाडी सरकार चांगलं काम करत आहे. आमच्या लोकांना कशाला आकर्षित करता? अजितदादा खूप ‌उत्तम नेते आहेत. चांगलं काम करतात. गंमत निर्माण होईल अस बोललं तर त्यांची प्रतिष्ठा कमी होईल, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

भाजपचे आमदार नाराज असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत. तसंच राष्ट्रवादीत लवकरच मोठी महाभरती होणार असल्याचा दावा ते करत आहेत. यावर तुम्ही सरकार चालवा आम्ही विरोधी पक्ष सांभाळू, असं पाटील म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढले तर त्यांची ताकद जास्तच होणार. पण आम्हीही ग्रामपंचायत निवडणूका ताकदीने लढवणार. एक मात्र खरं निवडणूक असो वा निर्णय शिवसेना आपलं नुकसान करुन घेत आहे हे मात्र तितकंच खरं आहे, असेही पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांच्यावरती पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, कोण संजय राऊत? अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्यांनी दिलेल्या घटनेतील चौकटींना मानायचे नाही. डॉ. आंबेडकरांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरु आहे आणि पुढेही सुरु राहील. हे सर्व तुम्हांला मान्य नाही का?, असा सवाल त्यांनी संजय राऊत तसंच शिवसेनेला केला.

ही बातमी पण वाचा : शेतकऱ्यांशी चर्चा करायला हरकत काय? अजित पवारांचा केंद्र सरकारला प्रश्न

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER