माह्यासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर… गावरान शैलीत अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Ajit Pawar & Chandrakant Patil

मुंबई :- भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीतील पक्षांनी एक-एकटं लढावं, असे वक्तव्य केले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पलटवार केला आहे. आम्ही कसंही येऊन कोणी बिनकामाचा सल्ला देण्याची गरज नाही, अशा शब्दांमध्ये अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं. “हे बघा आम्ही एकटं यायचं की आघाडी करून यायचं ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. यांनी कोणी बिनकामाचा सल्ला देण्याचं काही कारण नाही. ” असा टोला अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

“हे बघा एक नक्की आहे. माह्यासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर खुल्या मनाने पराभव मान्य केला असता. आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला एवढा दारुण पराभव का झाला याचं चिंतन करून वगैरे वगैरे. पण तोदेखील दिलदारपणा दाखवण्याची दानत त्यांच्या लोकांची नाहीय. पण ठीक आहे, त्यांचं  त्यांना लखलाभ, असेही पवार म्हणाले.

दरम्यान विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

ही बातमी पण वाचा : … ते मुख्यमंत्र्यांचे  कौतुक की अब्रु काढणं हे अजित पवारच सांगू शकतात ; भाजपा नेत्याचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER