१४ जिल्हे रेड झोन, लोकलवर निर्बंध आवश्यक; लॉकडाऊनबाबत वडेट्टीवारांनी दिले ‘हे’ संकेत

Vijay Vadettiwar

मुंबई : राज्यात कोरोना प्रादुर्भाव (Corona Virus) नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन (Corona Lockdown) जाहीर करण्यात आला. राज्य सरकारकडून १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला. आता १ जूननंतर लॉकडाऊन संपेल की वाढेल असा प्रश्न जनतेला पडत आहे. दरम्यान, लॉकडाऊन संदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी मोठे विधान केले आहे.

राज्यात १ जूननंतर निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे, असे संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. याचबरोबर, राज्यात सध्या १४ जिल्हे रेड झोनमध्ये आहे. येत्या ५-६ दिवसात राज्यात काय परिस्थिती असेल याचा आढावा घेऊनच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. “लोकल बंद असल्यामुळे मुंबईत रुग्ण कमी झाले आहेत. लोकलवर काही दिवस निर्बंध लावावाच लागेल. १५ दिवस तरी लोकलची गर्दी कमी करावीच लागले. राज्यातील १४ जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. तिथे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा.लोकल बंद असल्यामुळे मुंबईतील रुग्णसंख्या कमी झाली आहे. लोकलमध्ये काही दिवस निर्बंध लावाच लागेल.” असे विजय वडेट्टीवारांनी नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button