शिक्षणासोबत विचारसरणी महत्त्वाची : पंतप्रधान मोदी

कोलकाता :- विश्व भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सहभागी झाले. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद (Interact with students) साधला. यावेळी ते बोलले की, जगभरातील वेगवेगळ्या भागांमध्ये दहशत पसरवणे, हिंसा घडवून आणणे यांमध्ये उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रिय सहभाग वाढत चालला आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले. कोरोना नियमांमुळे या सोहळ्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहिल्याचा आनंद आहे, असे मोदींनी सांगितले.

शिक्षणासोबत विचारसरणी महत्त्वाची
देशात लागू होणारे नवीन शैक्षणिक धोरण हे भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी उत्तम आहे. शिक्षणाबरोबरच विचारसरणीदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. तुमचे विचार एखाद्या समस्येचे निराकरण करणारे व्हायचे की समस्येचा भाग व्हायचे हे ठरवते, असे मोदींनी नमूद केले.

भारताच्या समृद्ध संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करू शकता
“दहशत पसरवणे, हिंसा घडवून आणणे यात उच्चशिक्षित आणि व्यवस्थित प्रशिक्षण घेतलेल्यांचा सक्रिय सहभाग वाढत आहे. कोरोना संकटाच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णालयांमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये काम करणाऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी झटणारे आहेत. तुम्ही कोणत्या विचारसरणीचा अवलंब करता हे महत्त्वाचे ठरते. विचार करताना सकारात्मक विचार करता की नकारात्मक… यावर तुमचे काम कसे होईल हे ठरते. तुम्हाला दोन्ही पर्याय खुले असतात. तुम्ही केवळ एका विद्यापीठाचा भाग नसून, एका परंपरेचा भाग आहात, हे कायम लक्षात ठेवावे. गुरुदेवांनी ‘विश्व भारती विद्यापीठ’ असे नामकरण करण्यामागे विशेष उद्देश होता. या विद्यापीठातून जी व्यक्ती शिक्षण घेऊन बाहेर पडते, ती भारत आणि भारतीयत्वाबाबत नवीन दृष्टी जगाला देईल, अशी अपेक्षा गुरुदेव यांना होती. भ्रम, त्याग आणि आनंद या मूल्यांवर आधारित या विद्यापीठात भारताच्या समृद्ध संस्कृतीचे ज्ञान आत्मसात करू शकता.” असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER