आदर्श शिक्षक पुरस्कार; नारायण मंगलाराम आणि संगीता सोमाणी मानकरी

Narayan Mangalaram and Sangeeta Somani Mankari

अहमदनगर : शिक्षक दिनानिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील ४७ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्रदान केले. यात महाराष्ट्रातील नारायण मंगलाराम आणि संगीता सोमाणी यांचा समावेश आहे. कोरोनाच्या साथीमुळे हे पुरस्कार आभासी कार्यक्रमद्वारे (ऑनलाईन) प्रदान करण्यात आलेत.

सलग तिसदा अहमदनगर जिल्ह्याला हा पुरस्कार मिळाला. राहुरी तालुक्यातील गोपाळवाडी-चेडगाव येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकांत मंगलाराम याचे मानकरी आहेत. गोपाळवाडी या शाळेत बहुतांश मुले भटक्या जमातीचे आहेत. त्यांना शिक्षणात गोडी निर्माण करून वेगवेगळे उपक्रम मंगलाराम यांनी राबविले. नवी दिल्लीच्या ncert च्या पथकाने या शाळेत येऊन यापूर्वी मंगलाराम यांच्या उपक्रमाची दखल घेतली. ‘आर्ट इंटेग्रॅटेड लर्निंग’ या उपक्रमांतर्गत कलेच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. नाट्यकीकरण, बाहुली नाट्य यासारखे प्रयोग केले. ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह टीचर्स’च्या माध्यमातून जगातील २५ देशातील शिक्षकांच्या संपर्कातून विद्यार्थ्यांना जगाच्या ‘व्हर्चुअल’ सहलीचा आंनद दिला. ‘कल्चर बॉक्स’ची देवाण – घेवाण करण्यात आली.

संगीता सोमाणी

मुंबईतील चेंबूरच्या आटोमिक रिसर्च सेंटर स्कूलच्या संगीता सोमाणी या ३५ वर्षांपासून शिक्षिका आहेत. नवीन प्रयोगातून शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. खेळण्यातून रसायनशास्त्र शिकवण्याचा प्रयोग त्यांनी केला. गरीब विद्यार्थ्यांना शक्षणासाठी मदत केली. सर्व शिक्षकांनी शिकवण्याचे काम मन लावून केले पाहिजे असे त्या म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER