कोविडवर उपचारासाठी अँटीसेरा विकसीत; ICMR ला यश

ICMR- develop antisera for covid treatment prevention .jpg

नवी दिल्ली: इंडियन काउंसील ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि बॉयोलॉजिक ई. लिमिटेड, हैदराबाद (Biological E. Limited, Hyderabad) यांनी एकत्रितपणे एक विशेष प्रकारचे अँटी-सिरम (Antisera) विकसित केले आहे. हे कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरू शकते. हे अँटी-सिरम सध्या प्राण्यांमध्ये विकसित करण्यात आले आहे.

अँटिसेरा हे ब्लड सेरा आहेत ज्यात विषाणूजन्य किंवा प्रतिजनविरूद्ध प्रतिपिंडे असतात आणि त्या विषाणूशी संबंधित रोगांच्या उपचारात किंवा प्रतिबंध करण्यासाठी इंजेक्शन दिले जातात.

“रेबीज, हेपेटायटीस बी, व्हॅक्सिनिया विषाणू, टिटॅनस, बोटुलिझम आणि डिप्थीरिया सारख्या अनेक विषाणूजन्य आणि जिवाणू संक्रमणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैद्यकीय विज्ञानात यापूर्वी या उपायांचा वापर करण्यात आला आहे,” असे आयसीएमआरने गुरुवारी ट्विट करून सांगितले.

बोली भाषेत सांगायचे झाल्यास, वैज्ञानिकांनी एखाद्या बाहेरील बॅक्टेरियासोबत अथवा व्हायरससोबत लढण्यासाठी आवश्यक अँटीबॉडी तयार केली आहे. हिचा उपयोग केवळ कोरोना संक्रमणाच्या उपचारातच नव्हे, तर संक्रमणापासून बचावासाठीही केला जाऊ शकते, यामुळे हा शोध अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

कोरोनावर मात केलेल्या लोकांच्या प्लाझ्माचा वापरही काहिशा अशाच उपचारांसाठी केला जातो. मात्र, यात अँटीबॉडीचा स्तर व्यक्तीपरत्वे वेगवेगळा असतो. यामुळे याचा वापरही अवघड असतो. हे यश भारतात सार्वजनिक आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे आयसीएमआरने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER