इचलकरंजीत छापा; एक लाखाचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील नदिवेसनाका येथील परिसरात गस्त घातल असताना गोपनीय माहितीवरुन राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागाच्या संयुक्त छाप्यात दोघाजणांना जुनी पांढऱ्या रंगाची मारुती (क्रनं. MH-09-S-942) मधून अवैध बनावट विदेशी मद्याची वाहतूक करीत असताना पकडून गुन्हा दाखल केला.

पांढऱ्या रंगाची मारुती, विदेशी बनावट मद्याच्या मॅक्डोवेल नं. 1, व्हिस्कीच्या 180 मि.लीच्या 144 बाटल्या, इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मि.लिच्या 144 बाटल्या, डायरेक्टर स्पेशल व्हिस्कीच्या 180 मि.लिच्या 96 बाटल्या, मॅक्डोवेल सेलिब्रेशन रमच्या 180 मि.लिच्या 96 बाटल्या आदी 1 लाख 1 हजार 720 इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत आशिष आप्पासाहेब लाड (वय 42) इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. निप्पाणी (आंदोलन नगर), जि. बेळगाव, प्रितम गजानन यमगेकर (वय 29) रा. आश्रयनगर, निप्पाणी, जि. बेळगाव यांच्या विरुध्द गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

विभागीय उपायुक्त वाय.एम. पवार, जिल्हा अधीक्षक गणेश पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली गावभाग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, इचलकरंजी विभागाचे निरीक्षक पी.आर.पाटील, दुय्यम निरीक्षक अतुल पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक जी.एच.हजारे, जवान विलास पवार, सुभाष कोले यांनी ही कारवाई केली.

इचलकरंजी अशा प्रकारे कोणत्याही ठिकाणी अवैध मद्य निर्मिती साठा अथवा विक्री व वाहतूक आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करुन अशाप्रकारची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे निरीक्षक श्री. पाटील यांनी सांगितले.