इंग्लंडविरुद्ध ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल; कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

Indian Squad For ICC World Test Championship

मुंबई : जून महिन्यात टीम इंडियाविरुद्ध (Team India) न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) २०२१ चा अंतिम सामना रंगणार आहे. या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती BCCIने ट्विट करत दिली आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने खेळाडूंची निवड केली आहे. या अंतिम सामन्यासाठी नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हा अंतिम सामना १८ ते २३ जून दरम्यान साऊथम्पटनमध्ये होणार आहे.

निवड समितीने पुन्हा एकदा ‘युवा पृथ्वी शॉ’वर अविश्वास दाखवला आहे. यावेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पृथ्वीला संधी मिळाली नाही. पृथ्वीने विजय हजारे करंडकात आणि IPLच्या १४ व्या मोसमात शानदार कामगिरी केली. IPLच्या १४व्या मोसमातील ८ सामन्यात ३०८ धावा केल्या होत्या. त्यामुळे पृथ्वीचे कसोटी संघात कमबॅक होईल, अशी शक्यता होती. मात्र, पृथ्वीच्या पदरी निराशा पडली.

अशी आहे टीम इंडिया :
ह्या टीममध्ये एकूण २० खेळाडूंचा समावेश आहे. विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button