ICC Test Rankings: विराट कोहली चौथ्या क्रमांकावर कायम, ऋषभ पंतची रँकिंग सुधारली नाही

ICC Test Rankings

टीम इंडिया कसोटी तज्ञ चेतेश्वर पुजाराला ऑस्ट्रेलियामध्ये त्याला संयमी डाव खेळण्याचा फायदा झाला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) पहिल्या दहामध्ये कायम आहेत.

ICC ने आपले रँकिंग जाहीर केले आहे. ताज्या आकडेवारीनुसार विराट कोहली (Virat Kohli)कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराला एका स्थानाचा मिळवला आहे आणि तो सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहली (८६२ गुण) व पुजारा (७६० गुण) यांच्या व्यतिरिक्त कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे पण ८ व्या क्रमांकासह पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणारे भारतीय फलंदाजांमध्ये समावेश आहे.

टीम इंडियाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आणि स्टार सलामीवीर रोहित शर्मा अनुक्रमे १३ व्या आणि १८ व्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसन (९१९ गुण) फलंदाजी क्रमवारीत आघाडीवर आहे आणि त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ (८९१ गुण) व मार्लनस लब्युचेन (८७८ गुण) ऑस्ट्रेलियाच्या या जोडीचा क्रमांक येतो.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट ८२३ गुणांसह ५ व्या स्थानावर कायम आहे. गोलंदाजांविषयी बोलताना ज्येष्ठ फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (७६० गुण) व स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (७५७ गुण) अनुक्रमे ८ व्या आणि ९ व्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ९०८ गुणांसह अव्वल स्थानी आहे.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (८३९ गुण) आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज नील वेगनर (८३५ गुण) अनुक्रमे दुसर्‍या आणि तिसर्‍या स्थानावर आहेत. रविंद्र जडेजा (४१९ गुण) व आर अश्विन (२८१ गुण) यांनी अष्टपैलू खेळाडूंमध्ये अनुक्रमे तिसरे व सहावे स्थान कायम राखले आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स (४२७ गुण) अव्वल आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER