ICC ODI Ranking: विराट कोहली आणि रोहित शर्माने केले पुन्हा अव्वल, बुमराह टॉप -३ मध्ये कायम

Virat Kohli - Rohit Sharma - Jasprit Bumrah

ICC च्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली आणि रोहित शर्मा पहिल्या दोन स्थानांवर कायम आहेत. गोलंदाजांच्या यादीत बुमराह सर्वोत्तम भारतीय आहे.

ICC च्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी पहिला आणि दुसरा क्रमांक कायम राखला आहे, तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) गोलंदाजांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे.

कोहली आणि रोहित टॉपवर
कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये ८९ आणि ६३ धावा केल्या आहेत, त्याचे ८७० गुण आहेत. दुखापतीमुळे रोहित ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर मर्यादित षटकांच्या मालिकेचा भाग होऊ शकला नाही. कोविड -१९ महामारी सुरू झाल्यापासून त्याने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. परंतु तो पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (८३७) च्या पाच गुणांनी वर दुसर्‍या स्थानावर आहे.

न्यूझीलंडचा रॉस टेलर (८१८) आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरोन फिंच (७९१) हे फलंदाजांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये इतर खेळाडू आहेत. आयर्लंडचा अष्टपैलू पॉल स्टर्लिंग अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या सामन्यात शतकांमुळे २८५ धावा करून आठ स्थानांची कमाई करत २० व्या स्थानी पोहोचला. अफगाणिस्तानचे हशमतुल्लाह शाहदी, रशीद खान आणि जावेद अहमदी यांनाही रँकिंगमध्ये फायदा झाला.

तिसर्‍या क्रमांकावर कायम आहे बुमराह
गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह सर्वोत्तम भारतीय असून तो ७०० गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बाउल्ट (७२२) आणि अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान (७०१) यांनी अव्वल दोन स्थान मिळवले आहे.

बांगलादेशचा फिरकी गोलंदाज मेहदी हसन मिराजने नऊ स्थानांची कमाई केली असून तो चौथ्या स्थानी आला आहे. नुकत्याच संपुष्टात आलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने सात विकेट्स मिळवताना सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून कामगिरी केली. बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानही १९ व्या स्थानावरुन आठव्या स्थानावर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER