आयसीसीच्या पुरस्कारात प्रथमच एकाही भारतीयाला नामांकन नाही

ICC Awards nominations

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या प्लेयर ऑफ दी मन्थ पुरस्कारासाठी (Player of the month award) पहिल्यांदाच एकाही भारतीय खेळाडूला नामांकन मिळालेले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो; पण सर्व भारतीय क्रिकेटपटू हे गेल्या महिनाभर आयपीएलमध्ये (IPL) व्यस्त होते.

त्यामुळे एकाही भारतीयाला नामांकन मिळालेले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या नामांकनात पाकिस्तानचे बाबर आझम (Babar Azam) व फखर झमान (Fakhar Zaman) यांचा समावेश आहे. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी बजावली आहे. या दोघांशिवाय नेपाळचा फलंदाज खुशाल भुरटेल (Khushal Bhurtel) यालाही नामांकन मिळाले आहे. महिला क्रिकेटपटूंमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिली व मेगन शट आणि न्यूझीलंडची ली कास्पेरैक यांना नामांकन मिळाले आहे.

गेल्या महिन्यात पाकिस्तानचा बाबर आझम याने वन डे क्रिकेटच्या जागतिक क्रमवारीत विराट कोहलीचे नंबर वन स्थान पटकावले आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजयात महत्त्वाची ठरलेली ८२ चेंडूंत ९४ धावांची खेळी केली होती. टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही त्याने ५९ चेंडूंतच १२२ धावा फटकावल्या होत्या. फखर झमानने याच वन डे मालिकेत दोन शतकी खेळी केल्या होत्या. त्यात दुसऱ्या सामन्यातील १९३ धावांच्या खेळीचा समावेश होता. नेपाळचा खुशाल याने नेदरलँड व मलेशियासोबतच्या तिरंगी मालिकेत पाच सामन्यांत १७८ धावा केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button