स्वतःचा पाय स्वतः कापत सैनिकांचं नेतृत्त्व करणारा ‘इयान कार्डोजो’

Rochak Mahiti -Maharashtra Today

युद्धभूमित जबरदस्त दुखापत होऊन देखील भारताच्या विजयसाठी अनेकांनी शौर्याची परिसीमा गाठल्याचे किस्से आहेत. भारतीय सैन्याच्या शौर्याच्या बळावरच भारताचे सार्वभौमत्त्व टिकून आहे. अशाच एका वीर जवानाची गाथा नाव ‘इयान कार्डोजो.’ (Ian Cardozo,) ज्यांनी स्वतःच्या हातानं स्वतःचा पाय कापला. परंतू रणभूमितून माघार घेतली नाही. पाकिस्तानाच्या तावडीतून पुर्व पाकिस्तान स्वतंत्र करत बांग्लादेश जन्माला घालणाऱ्या भारतीय सैन्यातल्या इयान यांची ही साहस कथा.

इयान यांच्याबद्दल माजी लष्कर प्रमुख सॅम मानिकशॉ म्हणाले होते,”जर कोणी असं म्हणत असेल की मला मरणाचे भय वाटत नाही. तर कदाचित ती व्यक्ती खोटं बोलतेय किंवा ती व्यक्ती गुरखा असेल”

लहानपणापासून सैन्यात भरती व्हायचं होतं स्वप्न

१९३७ साली मुंबईच्या एका सामान्य कुटुंबात इयान यांचा जन्म झाला. देशासाठी बलिदान या शब्दाला समानअर्थी शब्द म्हणून त्यांच्या मुलाच नाव घेतलं जाईल याची कल्पना त्यांनाही नव्हती. सामान्य कुटुंबातल्या मुलाप्रमाणं सामान्य आयुष्य आपला मुलगा जगेल अशी त्यांच्या पालकांना आशा होती. इयान यांना लहानपणापासूनच सैन्यात भरती व्हायचं होतं. महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्यांनी ‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’ मध्ये प्रवेश मिळवला. तिथून सुरु झाला त्यांचा फौजी बनवण्याचा प्रवास.

काही वर्षांमध्ये त्यांनी प्रशिक्षण पुर्ण केलं. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी मिलेट्री अकॅडमीत प्रवेश मिळवला. तिथं ही त्यांनी सर्वांना आपल्या प्रतिभेच्या जोरावर चकित केलं. ट्रेनिंग पुर्ण होताच ‘गोरखा रायफल’मध्ये त्यांनी जागा मिळवली. लहानपणा पासून त्यांनी पाहिलेलं स्वप्न मेहनतीच्या जोरावर त्यांनी सत्यात उतरवलं.

पाकिस्तानशी युद्ध

वर्ष होतं १९९१, पाकिस्तान आणि भारतात दिवसेंदिवस तणाव वाढत होता. युद्धाची परिस्थीती बनली होती. थोड्याच दिवसात युद्ध सुरु होईल हे सष्ट दिसत होतं आणि ठिणगी पडली. पाकिस्तानानं युद्धाला सुरुवात केली असली तरी युद्धाचा शेवट करण्याच्या इराद्यानं भारतीय सैन्य पुढं सरकलं. युद्धासाठी भारतानं सैन्यांच्या तुकड्या रणभूमीवर पाठवलायला सुरुवात केली. ४/३ गोरखा राइफल्समध्ये इयान होते. त्यांची तुकडी युद्धासाठी रवाना झाली नव्हती, परंतू जेव्हा पाकिस्तानशी लढताना एक सैन्याधिकाऱ्याचा मृत्यू झाला तेव्हा इय़ान यांना युद्धाला जाण्याची संधी मिळाली.

याच दरम्यान भारतीय सैन्याच्या पहिल्या हेलिकॉप्टर मोहिमेचा ते हिस्सा बनले. इयान आणि त्यांचे साथिदार जेव्हा ठिकाण्यावर पोहचले तेव्हाच त्यांचा सामना पाकिस्तानी सैन्याशी होऊ लागला. त्यांच्या भोवती प्रतिकुल परिस्थीती निर्माण झाली होती. परिस्थीती किती ही भीषण झाली तरी मागं हटायचं नाही हे त्यांनी सैन्य प्रशिक्षणात अंगिकारलं होतं. पाकिस्तानी सैन्याच्या तुलनेत संख्याबळ कमी असताना सुद्धा त्यांच्या तुकडीनं जबर प्रतिकार केला.

सुरुंगावर पडला पाय

दिवसागणिक युद्ध गंभीर होत होतं. सर्व तुकड्या सैन्याच्या वतीनं बँकअप येण्याच्या प्रतिक्षेत होत्या. या दरम्यान काही तुकड्यांवर बंगालच्या कैद्यांची सुटका करण्याची जबाबदारी मिळाली. बी.एस.एफ.च्या दोन तुकड्यांनी मोहिमीला सुरुवात केली. दोन्ही तुकड्या कैद्यांच्या जागेवर पोहचल्या. पाकिस्तानी सैन्याचा प्रतिकार करत त्यांना मागं ढकलण्यात भारतीय सैन्याला यश आलं होतं.

कैद्यांना परत आणण्याची जबाबदारी इयान यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्यांना कल्पना नव्हती की ते जाळ्यात अडकणार आहेत. त्यांची नजर चुक झाली त्यांना लक्षातच आलं नव्हत की ज्या जागेवर त्यांनी पाय ठेवलाय तिथं पाकिस्तानी सैन्यानं सुरुंग पेरलेले आहेत. काही पावलं पुढं टाकल्यानंतर त्यांचा पाय माइनवर पडला. जोरदार धमका झाला. ते स्फोटामुळं दुर फेकले गेले. रक्तबंबाळ अवस्थेत ते पडले होते. डोळ्यासमोर अंधार होता. त्यांना एका बांग्लादेशी नागरीकानं सैन्य छावणीपर्यंत पोहचवलं.

स्वतःचा पाय कापण्यात केला नाही संकोच

सैन्य छावणीपर्यंत इयान सुरक्षित पोहचले. त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यासाठी वेळही नव्हता. सर्वांना भीती होती की इयान यांचा मृत्यू तर होणार नाही ना? काही वेळे नंतर इयान शुद्धीवर आले. इयान यांच डोकं भयंकर दुखत होतं. त्याला कारण होतं त्यांचा सुरुंगावर पडलेला पाय. तो पाय कापण्याची विनंती त्यांनी साथीदारांना केली परंतू तिथं कोणतंच वैद्यकीय उपकरण नव्हतं. शेवटीत त्यांच्या जवळच्या कुकरीनं पाय कापा अशी इच्छा त्यांनी साथिदारांना बोलून दाखवली. इयान यांच कोणीच ऐकत नसल्याचं पाहून त्यांनी स्वतःच ते काम करण्याचं ठरवलं. स्वतः त्यांनी स्वतःचा पाय कापला आणि एखा खड्ड्यात पुरायला सांगितलं.

पाय कापल्यानंतरही त्यांची हिंमत कमी आली नाही. त्यांनी त्याच आवस्थेत सैन्याच्या तुकडीचं नेतृत्व केलं. त्यांचा दृढनिश्चय बघून तुकडीत ही हत्तीच बळ संचारलं. युद्ध संपेपर्यंत ते लढत राहिलं. काही दिवसातच भारतानं युद्धात विजय मिळवला. इयान यांना बांग्लादेशमधून भारतात आणण्यात आलं त्यांच्यावर उपचार झाले. त्यांचे अचाट शौर्य बघून सर्व जण हैराण होते. पुढं त्यांना ‘सेना मेडल’नं सन्मानित करण्यात आलं. देशहितासाठी त्यांनी दाखवलेल्या शौर्याचा आजही उल्लेख केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button