भारतीय वायुदलाचे पथक राफेलच्या फ्रांन्समधील कार्यालयाला जाणार

IAF team will go to France to visit Rafel's office

नवी दिल्ली : ‘भारतीय राफेल प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीम’च्या फ्रान्समधील कार्यालयात काही अज्ञातांनी घुसखोरी करून माहिती चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी भारतीय वायुदलाचे एक पथख फ्रान्सला जाणार आहे. पॅरीसमधील इंडियन एअरफोर्सच्या कार्यालयात 19 मे रीज अज्ञातांकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.

फ्रान्समध्ये दसॉल्ट कंपनीच्या माध्यमातून भारतासाठी राफेल विमानांची निर्मिती होत असून त्यासाठी इंडियन एअरफोर्स राफेल प्रोजे्ट मॅनेजमेंट टीमद्वारे राफेल विमानांची निर्मिती आणि भारती. अधिका-यांच्या प्रशिक्षणावर लक्ष ठेवले जाते. दरम्यान अतिशय संवेदनशील ठिकाणी अज्ञातांकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे तेथील माहिती चोरीच्या शक्यतेमुळे वायुदल सतर्क झाले आहे. हे पथक तिथे जाऊन सखोल चौकशी करेल.

ही बातमी पण वाचा : स्विस बँकानी दिली काळा पैसा ठेवणाऱ्यांची यादी