‘पवारांनी यूपीएच नेतृत्व केल्यास नक्कीच आवडेल’, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचं मोठं विधान

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने शरद पवार यांना विविध राजकीय नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या असून मोठे विधान केले आहे.

शरद पवार यांनी यूपीएच नेतृत्व केल्यास नक्कीच आवडेल, असे सूचक विधान शिंदे यांनी केले आहे. यावेळी ते म्हणाले की, सहस्त्रचंद्रदर्शनाचा हा सोहळा आहे. त्यांनी 50 वर्षांत अनेक चढ उतार बघितले, त्यांना अनेकांनी त्रास दिला मात्र त्यांनी सामाजिक समतोल बिघडू दिला नाही, स्मरणशक्ती प्रचंड आहे, पक्षाची जडणघडण त्यांना आठवते, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सर्वांशी संबंध ठेवणारा नेता, पद न मिळताही पवार साहेब आजही देशाचं नेतृत्व करत आहेत. पवारांनी च मला राजकारणात आणलं मोठं केलं. कारकिर्दीत माझी योग्यता नव्हती. पण पवार सर्वांना माझ्याबद्दल सांगायचे. चंद्रशेखर असो की आर के सिन्हा सर्वांना ते माझ्याबाबत सांगायचे. मी कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेतलं तेही सांगायचे. एखाद्याला पुढे न्यायचे म्हटलं तर ते कशाही प्रकारे त्याला मोठं करतात, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER