राज ठाकरेंचा अयोध्या दौरा यशस्वी होवो, नारायण राणेंच्या मनसेला शुभेच्छा ; शिवसेनेवर टिकास्त्र

CM Thackeray-Narayan Rane-Raj TRhackeray

मुंबई :-  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) अयोध्या दौ-यावर ( Ayodhya Tour) जाणार आहेत. मनसेने हे जाहीर केल्यानंतर राज यांना अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपचे खासदार नारायण राणे ( Narayan Rane) यांनीही राज यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘एखाद्या नेत्याला दर्शनाला जावे असे वाटले, तर त्यावर काय बोलणार? पण माझ्या शुभेच्छा. त्यांचा दौरा यशस्वी होऊ दे’, असे नारायण राणे यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्यावर बोलताना म्हटले आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांनी नारायण राणे यांना मनसे आणि भाजप युतीबद्द विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबतचे प्रयोजन आपल्याला माहीत नाही.

शिवसेनेवर सोडले टिकास्त्र –

राणे यांनी मनसेला शुभेच्छा दिल्या मात्र, नेहमीप्रमाणे शिवसेनेवर टिकास्त्र सोडसे आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात मात्र शिवसेनेने सहभाग नोंदवला नाही. शिवसेना ही मागून असते. ते अंडरग्राउंड असतात, मातोश्रीवरून बटण दाबले की आलो रस्त्यावर. शिवसेना सगळे बटन दाबून करते. मातोश्रीची सुरक्षाव्यवस्था आता कडक करण्यात आली आहे. त्यासाठी मातोश्रीला जाळ्या लावतात, अशा शब्दांत नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला.

ही बातमी पण वाचा : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल : भाजप नेत्याचे वक्तव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER