… नंतरही मीच राहणार अमरावतीची खासदार; नवनीत राणा यांनी ठणकावले

Navneet-Rana

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध ठरवत येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रे जमा करावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या निकालावर प्रतिक्रिया देताना नवनीत राणा म्हणाल्यात – आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, तिथे न्याय मिळेल. २०२४ पर्यंत व नंतरही मीच अमरावतीची खासदार राहणार आहे.

राजकारणातील प्रतिस्पर्धी व शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्यात – ते अति उत्साहित होऊन निकालानंतर प्रतिक्रिया देत सुटले आहेत; थोडा संयम बाळगावा. हायकोर्टाने दिलेल्या मुदतीत कायदेशीर पाऊल उचलणार आहोत. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन असणाऱ्या जातपडताळणी समितीने माझे जातप्रमाणपत्र तीन वेळा पूर्ण छाननी करून वैध असल्याचा अहवाल सादर केला होता.

नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केले आहे. त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव मतदार संघ होता. त्यांच्या निवडीवर आक्षेप घेताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र न्यायमूर्ती धानुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने रद्द केले आहे. हे प्रमाणपत्र घेताना त्यांनी खोटी आणि बनावट कागदपत्र सादर केली होती असे निरीक्षण हायकोर्टांने नोंदवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button