पडळकरांच्या विधानावर आता नाही तर, नंतर सविस्तर बोलेन – शरद पवार

पुणे : ‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागेलेले कोरोना आहे’, असे बेताल विधान भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केले होते. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन केलं. या सर्व घडामोडीत पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन, असं पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

पुण्यात कोरोनाचा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला.

या बैठकीनंतर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, “मला बोलायचं आहे, पण आताच नाही, लवकरच सविस्तर बोलेन”, असं सूचक वक्तव्य केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER