९ सप्टेंबरला मी मुंबईत परतणार; कुणाच्या बापाची हिंमत असेल तर मला थांबवा- कंगना

मुंबई : सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात (Sushant Singh commits suicide) कंगना राणौतने (Kangana Ranaut) पहिलीच प्रतिक्रिया बॉलिवूडमधील दिग्गजांच्या विरोधात दिल्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले. तेव्हापासूनच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी कंगनाच्या विरोधात भूमिका घेतल्याचे दिसते. कंगनानेही हार न पत्करता ट्विटरवॉर सुरूच ठेवले.

ही बातमी पण वाचा:- मी हाडाचा शिवसैनिक, धमकी नव्हे, अ‍ॅक्शन घेतो; राऊतांचा पुन्हा रनौतला इशारा

आता कंगनाने थेट मुंबईवरच शाब्दिक हल्ला चढवला. कंगनाच्या मुंबईला भलेबुरे बोलण्यावरून बॉलिवूडकर तिच्यावर अधिकच संतापले आहेत. तसेच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही कंगनाचे नाव न घेता कंगनावर शाब्दिक हल्ला चढवला. संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेनंतर कंगनानेही ट्विटरवरून कुणाचेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आव्हान दिले आहे.

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगणा राणावतने (Kangana Ranaut) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, कंगनाच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडकरांनी तिच्यावर चागलेच शरसंधान साधले व मुंबईला भले बुरे म्हणणाा-या कंगनाने पुन्हा मुंबईत पाय ठेवू नये असे सुनावले. त्यावरून कंगनानेही त्यांना आव्हान देत मी 9 सप्टेंबरला मुंबईत परतणार आहे व माझ्या येण्याची वेळ देखील सांगणार. कुणाच्या बापाची हिम्मत असेल मला थांबवा असे थेट आव्हान कंगनाने दिले आहे.

बरेच लोक मला परत मुंबईला न येण्याची धमकी देत आहेत म्हणून मी आता येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे, जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेल तेव्हा आल्याची माहिती सोशल मीडियावरून देईल. कुणाच्या बापात हिम्मत असेल तर मला थांबवा असे ट्विट कंगनाने केले आहे.

मुंबईला पाकव्याप्त म्हणणा-या कंगनाला रेणुका शहाणे, सुबोध भावे यांनीही तिला चांगलेच खडसावले होते. तर, नुकतेच संजय राऊत यांनीही नाव न घेता, कंगनावर शाब्दिक हल्ला चढवला. ते म्हणाले, ही मुंबई १०६ हुतात्मांनी मिळवली आहे. या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे. अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी. अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनाला नाव न घेता सुनावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER