मी परत कोल्हापूरला येणार, चंद्रकांत पाटील यांचे विरोधकांना उत्तर

Chandrakant Patil

पुणे :- कोल्हापूर सोडून पुण्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विरोधकांकडून कायम लक्ष्य केले जाते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील आता आपण पुणे सोडून कोल्हापूरात परतणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

ते शुक्रवारी पुण्यातील अटल संस्कृती गौरव पुरस्काराचे वितरण सोहळ्यात बोलत होते. या कार्यक्रमाच्या मंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, पुणे असं आहे की, याठिकाणी प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं. पण देवेंद्र मी तुम्हाला सांगतो, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. विशेषत: मला विरोधकांना ही गोष्ट सांगायची आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदींनी (PM Modi) सह वर्षात शेतकऱ्यांनी समृध्दी, सुख व सुरक्षितता मिळावी यासाठी प्रयत्न केले. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांसाठी केले नाही ते मोदी सरकारने करून दाखवीले आहे. शेतकऱ्यांचे खरे दुःख मोदींने ओळखले. त्यामुळे शेतीचा पोत सुधारणे, धरणांचे अर्धवट प्रकल्प पूर्ण करणे, पीक विम्यात सुधारणा करणे, अशा उपाययोजना त्यांनी राबवल्या. प्रत्येक शेतकऱ्याला युरिया मिळेल याबाबत कार्यवाही केली, शेतकरी आंदोलनात कम्युनिस्टांचा पुढाकार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या आवाहनाला बळी पडत आहेत. सोनिया गांधीनी शरद पवार (Sharad Pawar) यांना कृषी खात्याचे काम नीट करु दिले नाही, असा आरोप खासदार गिरीश बापट यांनी यावेळी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER