मी स्वतः आमदार जाधवांची नाराजी दूर करीन – ना. उदय सामंत

Bhaskar Jadhav - Uday Samant

रत्नागिरी/प्रतिनिधी : शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव जर नाराज असतील तर मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन त्यांची नाराजी दूर करेन असा पवित्रा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी घेतला आहे. शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यात भाजपला रोखण्यासंबंधी सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि संघटना वाढीसाठी दिशा ठरवण्यात आली.

चिपळुणातील पॅराकमांडो जवानाचा मध्यप्रदेशात अपघाती मृत्यू

यावेळी आमदार भास्कर जाधव यांच्या नाराजीचा विषय निघाला. आमदार उदय सामंत याना मंत्रीपद देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही म्हणून भास्कर जाधव नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात जाहीरपणे दिसून आली.

या बैठकीत ना. उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या नाराजीवर भाष्य केलं. आमदार भास्कर जाधव जर नाराज असतील तर मी स्वतः त्यांच्या घरी जाऊन नाराजी दूर करेन असे ते म्हणाले. मुख्यमंत्री येणार होते त्या दिवशी हेलिपॅडजवळ स्वागतासाठी आलेल्या आमदार जाधवांचे स्वागत मी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून केले, असेही सामंत यांनी सांगितले.