माझ्या लेव्हलची व्यक्ती असेल तरच त्याला उत्तर देईल – चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire

औरंगाबाद : मनसे मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे नाव घेऊन राज्यात तुमचा मुख्यमंत्री आहे. तेव्हा औरंगाबादचे संभाजी नगर करून दाखवा, मनपा निवडणुकीत तुम्हाला शहरातून फिरू देणार नाही असे खुले आव्हान दिले होते. यावर चंद्रकांत खैरे पत्रकारांशी बोलतांना म्हणाले हर्षवर्धन जाधव हा वेडा माणूस आहे, यांच्या टीकेला उत्तर द्यावे एवढी त्यांची लायकी नाही.

विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही मनपा निवडणुकीत ११५ उमेदवार देणार – डॉ. सुभाष माने

त्यामुळे यावर मी अधिक बोलणार नाही. माझ्या लेव्हलची व्यक्ती असेल तरच त्याला उत्तर देईल अशा शब्दात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हर्षवर्धन जाधव यंानी दिलेल्या आव्हानाची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या शहराचे संभाजीनगर अशा नामकरणाची घोषणा कोणत्याही क्षणी करतील हे मी यापूर्वीही सांगितले आहे. त्यामुळे संभाजीनगर वरून हर्षवर्धन जाधव सारख्या व्यक्तीने शिवसेनेला आव्हान देण्याच्या भानगडीत पडू नये, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.