‘दानवेंना पराभूत केल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नाही’, अब्दुल सत्तारांचा पण

Abdul Sattar

धुळे :- राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat Elections) जोरदार वारे वाहू लागले आहेत. राज्यातील मुदत संपणाऱ्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी पक्षांच्या पुरस्कृत पॅनल्समध्ये चढाओढ चांगलीच रंगणार आहे. मराठवाड्यात देखील आता नेत्यांनी जय्यत तयारी केली आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी थेट भाजप नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना खुलं आव्हान दिलं आहे.

जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करणार नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असा पण त्यांनी केल्याने आता ग्रामपंचायत निवडणुका प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. दरम्यान, ‘राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका केवळ निवडणुका नाहीत. तर भाजपला धडा शिकवण्याची ही उत्तम संधी आहे. या निवडणुकीत भाजपला धडा शिकवून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा. जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाच पाहिजे’ असं म्हणत सत्तारांनी भाजपविरोधात बिगुल फुकले आहे.

ही बातमी पण वाचा : ‘आमचे अजितदादा तर त्याहूनही वर निघाले’, भर सभेत फडणवीस संतापले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER