गंभीर व्यक्तिरेखेत माझे वेगळे रूप दिसेल – सुनील ग्रोव्हर

Sunil Grover

सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) म्हणजे विनोदी अभिनेता. छोट्या पडद्यावरील अनेक कॉमेडी मालिकांमधून त्याने प्रेक्षकांना सतत हसवण्याचे काम केले आहे. कपिल शर्मा (Kapil Sharma) शोमधील तो साकारीत असलेली गुत्थी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या प्रचंड आवडीची होती. सुनील या भूमिकेत बहार उडवून देत असे, नंतर त्याने स्वतःही काही विनोदी मालिकांची निर्मिती केली. सिनेमातही (Movies) विनोदी भूमिका साकारल्या. मात्र आता तो एका गंभीर भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. अली अब्बास जफरच्या तांडव या वेबसीरीजमध्ये तो ही वेगळी भूमिका साकारीत आहे. या भूमिकेच्या निमित्ताने सुनीलने आमच्याशी साधलेला संवाद.

‘तांडव’मध्ये तू म्हणे गंभीर व्यक्तिरेखा साकारीत आहेस, हे तुझ्या इमेजच्या विरुद्ध आहे असे वाटत नाही का?

हो तुला मिळालेली माहिती अगदी खरी आहे. मी “तांडव’मध्ये साडी नेसून प्रेक्षकांना हसवण्याचे काम करताना दिसणार नाही तर यात प्रेक्षकांना माझे एक वेगळे रूप दिसणार आहे. मला जेव्हा या शोबद्दल प्रथम विचारणा झाली तेव्हा हा शो म्हणजे एखाद्या जुन्या राजकीय कथेप्रमाणे शो असेल असे मला वाटले होते. मात्र जेव्हा मला कथा वाचण्यास दिली तेव्हा माझा अंदाज चुकीचा होता हे लक्षात आले. ‘तांडव’चे कथानक खूपच पकड घेणारे आहे. कथानक वाचताना मी त्यात गुंतून गेले होतो. ही कथा अत्यंत वेगळी आणि माझ्या आताच्या भूमिकेच्या विरुद्ध तर आहेच त्यातच ही भूमिका अत्यंत महत्वाची असल्याने मी लगेचच यासाठी होकार दिला. मी एकसुरी चक्रात अडकलो होतो, मजेशीर किंवा विनोदी भूमिकांच्या पलीकडे माझा विचारच केला जात नव्हता. अली अब्बास जफरने मात्र माझी निवड एका गंभीर आणि उत्कट व्यक्तिरेखेसाठी करेल असा विचारही मी कधी केला नव्हता. गुरूपालच्या व्यक्तिरेखेसाठी मी अलीची पहिली पसंती होतो हे त्याने मला सांगितल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी या व्यक्तिरेखेला न्याय देईन यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. मी या भूमिकेला न्याय दिला आहे की नाही हे आता प्रेक्षकच सांगतील.

गंभीर व्यक्तिरेखा साकारण्याचा अनुभव कला होता?

दिग्दर्शक अली अब्बासने मला ही भूमिका साकारण्यासाठी खूपच मदत केली. मला विनोदी भूमिका करण्याची सवय झाली होती. ही व्यक्तिरेखा वेगळ्या पद्धतीने करायची हे अलीने मला पहिल्यांदाच सांगितले. भूमिका साकारण्याची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे एक नवीन अनुभव होता आणि मी त्याचा भरभरून आनंद घेतला. अर्थात यासाठी अलीची मला खूप मदत झाली,

‘तांडव’ काय आहे?

हिमांशु किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांची निर्मिती असलेली ही वेबसीरीज ९ भागांचे राजकीय नाट्य आहे. एका आघाडीच्या राजकीय पक्षाचा नेता समर प्रताप (सैफ अली खान)ला वाटत असते की, लोकसभा निवडणुकीत त्याचा पक्ष जिंकला तर वारसाहक्काने त्याला पंतप्रधानपदाची खुर्ची मिळेल. पक्षाचे प्रमुख आणि देशाचे पंतप्रधान असलेले समरचे वडील देवकी नंदन (तिग्मांशु धुलिया) मात्र अद्याप निवृत्त व्हायला तयार नाहीत. देवकी यांची निकटची सहकारी अनुराधा (डिंपल कपाडिया), पक्षातील ज्येष्ठ नेते गोपाल दास (कुमुद मिश्रा) यांच्यासह अनेकजण स्वत:ला खुर्चीसाठी योग्य समजत आहेत. उपकथानकामध्ये आदर्शवादी विद्यार्थी नेता शिवा (झिशान अयुब) एका राजकीय समारंभात चमकतो आणि रातोरात तरुणांच्या गळ्यातील ताईत होतो. शिवाला बदल घडवून आणायचा आहे, तरुणाईला दिशा द्यायची आहे आणि राजकीय चौकटी हलवून सोडायच्या आहेत. शिवालाही सत्तेची चव चाखायला आणि त्यातूनच शिवा आणि समरमध्ये राजकीय तांडव सुरू होते अशी ही या वेबसीरीजची कता आहे.

ही बातमी पण वाचा : ‘तांडव’ने मला ‘ही’ गोष्‍ट करण्‍याची संधी दिली – सैफ अली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER