‘जे बोलतो ते करतो, २ दिवसात मदतीचा निर्णय घेणार’, मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना आश्वासन

Uddhav Thackeray-Osmanabad Visit

उस्मानाबाद :- तुम्ही मला फार मोठ्या अपेक्षेने भेटायला येत आहात. केवळ सवंग लोकप्रियता किंवा तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी आता तुमच्यासमोर मदतीचे काहीही आकडे सांगणार नाही. मात्र, पंचनामे पूर्ण होऊन मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मी तुमचं आयुष्य उभारायला पूर्ण ताकदीने मदत करेन, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना (Farmers) दिले. पंचनाम्यांचे काम 70 ते 80 टक्के पूर्ण झाले आहे. यानंतर लवकरच मंत्रिमंडळाची बैठक घेऊन आम्ही मदतीसंदर्भात निर्णय घेऊ. पण आता मी आकडे लावायला किंवा सांगायला आलेलो नाही, असे सांगत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तुर्तास नुकसानभरपाईसंदर्भात कोणतीही घोषणा करण्यास नकार दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अतिवृष्टीचा फटका बसलेल्या हिंगोली जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी त्यांनी काटेवाडी गावातील शेतकऱ्यांंशी संवाद साधला. महाराष्ट्र मला नवीन नाही. यापूर्वी जेव्हा आलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. तुमच्या वेदना, व्यथांना आवाज देण्याचं काम मी तेव्हा करत होतो. माझं कर्तृत्व शून्य आहे, पण तुमच्या आशिर्वादामुळे मुख्यमंत्री झालो आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, आजची परिस्थिती भयानक आहे. आपण संकटाता सामना केला नाही असं काही नाही. वर्षाची सुरुवातच जागतिक संकटाने झाली आहे. बाहेर पडू म्हणताच निसर्ग वादळ आलं आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला.

आम्ही परिस्थितीचा अंदाज घेत आहोत. अतिवृष्टी होण्याच धोका कमी झाला आहे. पण पुढील सात ते आठ दिवस वातावरण बिघडू शकतं असं हवामान विभागाने सांगितलं आहे. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणाऱ्यातला मी नाही. जे बोलतो ते मी करतो, पण करू शकत नाही असं बोलत नाही. तुम्ही सर्वजण मला ओळखता. तुम्हाला बरं वाटावं, टाळ्या वाजवाव्यात यासाठी आकडा जाहीर करणार नाही. मी दिलासा देण्यासाठी आलो आहे, आज मी तुमच्या समोर आलो हा दिलासा द्यायला आलेलो आहे कांदे गेले , उस गेले , द्राक्ष गेलं सगळं आयुष्य उध्वस्त झालेल आहे जमिनीच्या जमीन खरडून गेली आहे या पुलावरून आठ ते दहा फुटावर पाणी वाहत होते. असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. पुढील दोन दिवसांत मंत्रीमंडळ बैठक होईल. जवळपास ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. लवकरात लवकर आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे. आकडे लावण्यासाठी मी आलेलो नाही. जे करु तुमच्या सुखासाठी करु. धीर सोडू नका, खचून जाऊ नका, धीर सोडू नका खचून जाऊ नका आणि मगाशी माझ्या सोबत शेतकरी दादा आले ते तर रडायलाच लागले एक छोटीशी मुलगी पाचवीतली शाळा बंद आहे शाळा कोरोना मुळे बंद आहेत. उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं की, दोन दिवसांपूर्वी अक्कलकोट ला गेलो होतो. स्वामी समर्थांच्या मठा मध्ये नाही गेलो , मंदिर बंद असल्याने बाहेरूनच ऑनलाईन दर्शन घेतलं. स्वामींच वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी स्वामीनां नमस्कार केला तुम्ही माझ्या पाठीशी राहा. आता मी बाहेरुनच तुळजाभवानी देवीचं दर्शन घेणार आहे. माते लवकर संकट दूर कर असं साकडं आपण घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : सरकारने बोलघेवडेपणा सोडून प्रत्येक्षात कृती करून दाखवावी – देवेंद्र फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER