
मुंबई :- चौकशीसाठी हजर व्हा, असा समन्स ईडीने राष्ट्वादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) याना बजावला आहे. यावर, चौकशीसाठी ३० डिसेंबर २०२० रोजी हजर राहण्यासंदर्भात ईडीचा समन्स मिळाला आहे. त्यानुसार मी हजर राहणार आहे. सीडीचे नंतर बघू! अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.
ते म्हणालेत, या अगोदर लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, प्राप्तिकर विभाग यांनी चौकशी केली आहे. सर्व कागदपत्रांसह हजर राहिलो आहे. आता देखील ईडी सांगेल त्या प्रमाणे त्यांना मदत करायला तयार आहे. भोसरीच्या भूखंड खरेदी घोटाळा प्रकरणी ही चौकशी होते आहे. आतापर्यंत चारवेळा या संदर्भात चौकशी झाली असून, ही पाचवी वेळ आहे.
पत्रपरिषदेत त्यांनी माहिती दिली की, भोसरीचा भूखंड माझ्या पत्नाने खरेदी केला आहे. त्या ठिकाणचा व्यवहार हा रेडिरेकनरच्या दराप्रमाणे ५ कोटींचा आहे, या प्रकरणी चौकशी होते आहे. आणखी चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीकडून काही सूचना येईल, त्याप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्र मी सादर करेन.
माझ्या मागे ईडीची चौकशी लावली तर मी भाजपाच्या नेत्यांचा भ्रष्टाचार उघड करेन, अशी धमकी देतांना खडसे म्हणाले होते की, मी सीडी लावेन. त्या संदर्भात खडसे म्हणालेत की, ईडीच्या चौकशीसाठी मी हजर राहणार आहे. सीडीचे नंतर बघू!
ही बातमी पण वाचा : आज खडसे, उद्या माझा नंबर लागेल ; काँग्रेसच्या बड्या नेत्याची टीका
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला