तामिळनाडूचे संभाव्य मुख्यमंत्री राज ठाकरेंना म्हणाले, ‘आपल्या सल्ल्यानुसार मी पुढे जाणार’

Maharashtra Today

मुंबई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालात एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin)यांचा द्रविड मुनेत्र कळघमने जोरदार मुसंडी मारुन सत्तांतरण घडवून आणले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्टॅलिन यांचे देखील अभिनंदन केले होते. तामिळनाडू विधानसभेत स्टॅलिन यांच्या नेतृत्त्वाखाली डीएमके पक्षाने मिळवलेल्या विजयासाठी, स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिले. हीच भूमिका तुम्ही देखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल आणि काही बाबतीत राज्यांच्या स्वायत्ततेबद्दल आग्रही राहाल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन”, असे ट्विट राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी केले होते.

राज ठाकरे यांनी दिलेल्या शुभेच्छांना तात्काळ उत्तर देत स्टॅलिन यांनी राज ठाकरे यांचे धन्यवाद मानले. तसेच आपण सांगितल्यानुसार मी यापुढे भाषिक समानता, राज्य स्वायत्तता आणि प्रादेशिक अस्मितेच्या कामासाठी मी पुढे जाणे सुरू ठेवणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button