
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Case) प्रकरणात शिवसेना (Shivsena) नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांना वन मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला असला तरी शिवसेनेमागचे संकट अद्यापही संपलेले नाही .
भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचे ट्विट केले आहे. सोमय्या यांच्या या ट्विटने एकच खळबळ उडाली असून भाजपच्या रडारवरील हा नेता कोण? असा सवाल केला जात आहे.
#ShivSena #SanjayRathod is Out. I am to Expose with Documentary Evidences Scam of another Shivsena Leader in next 2 Days @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil @mipravindarekar
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 28, 2021
किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की , संजय राठोड गेले. आता दोन दिवसात मी पुराव्यांसह शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा उघड करणार आहे, असं ट्विट सोमय्या यांनी केले आहे. सोमय्या यांनी या ट्विटमध्ये कोणत्या शिवसेना नेत्याचा पर्दाफाश करणार त्याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे सोमय्या यांच्या रडारवर असलेला हा नेता कोण? असा सवाल केला जात आहे. सोमय्या यांनी हे ट्विट करताना त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना टॅग केले आहे. त्यामुळे दोन दिवसात सोमय्या कोणत्या नेत्याचा पर्दाफाश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला